रेडा (इंदापूर), दि. ७ : सिनेआभिनेञी दिपाली भोसले सय्यद यांना अश्लिल लज्जा उत्पंन्न होईल अशी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणा-याविरोधात सोमवारी राञी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:२८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीने सिनेआभिनेञी दिपाली भोसले सय्यद यांच्या मोबाईल वर कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत विचारणा केली. यावेळी सिनेआभिनेञी दिपाली भोसले सय्यद यांनी मानधन सांगितले असता आरोपीने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद हिस मानधन घेऊन काय करणार आहे असा बोलला याचा जाब दिपाली भोसले सय्यद यांनी विचारताच आरोपी म्हणाला की, जे सर्व अभिनेत्री करतात तेच करावयाचे आहे. शारीरिक संबंध व नशा आणि ड्रग तसेच लैंगिक संबधाची मागणी करून लज्जा उत्पंन्न होईल अशी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार सिनेआभिनेञी दिपाली भोसले सय्यद यांनी ठाणे पोलिस मुंबई पोलिस स्टेशनला भारतीय दंड विधान नुसार कलम ३५४(अ),३५४(ड),५०९,५०६(२).अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविंद्र जाधव करित आहेत.

No comments:
Post a Comment